जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । वडीलांच्या अंत्यसंस्कारावेळी सेवानिवृत्त पेालीस निरिक्षकाने स्वत:च्या ताब्यातील रिव्हाल्व्हर निष्काळजीपणाने वापरल्याने धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे दुर्घटना घडली होती, सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकाच्या मुलाने फायर करतांना अंत्यसंस्काराला उपस्थित एका जणाला गोळी लागून त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दाखल गुन्हृयात जळगाव जिल्हा न्यायालयाने आरोपी सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकास २ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व २ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. विठ्ठल श्रावण मोहकर असे शिक्षा झालेल्या सेवानिवृत्त पोलीस निरिक्षकाचे नाव आहे. सोमवार, ६ मार्च रोजी जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्या.एस.आर.पवार यांनी हा निकाल दिला आहे.
धरणगाव तालुक्यातील पिंप्री येथे सेवानिवृत्त पोलीस निरिक्षक विठ्ठल श्रावण मोहकर यांच्या वडीलांचे ११ मे २०१९ रोजी निधन झाले होते, पिंप्री गावातील स्मशानभूमी अंत्यविधीचा कार्यक्रम सुरु असतांना, विठ्ठल मोहकर यांनी त्यांच्याकडून रिव्हाल्वह आकाशाच्या दिशेने दोन फायर केले होते, त्यानंतर विठ्ठल मोहकर यांचा मुलगा दिपक मोहकर याने विठ्ठल मोहकर यांच्याकडून रिव्हाल्व्हर घेवून फायर करण्याचा प्रयत्न केला असता, यात अंत्यसंस्काराला उपस्थित तुकाराम वना बडगुजर वय ६५ रा. पिंपळगाव हरेश्वर ता. पाचोरा यांना गोळी लागून मृत्यू झाला होता. याप्रकरणी मयत तुकाराम बडगुजर यांचे नातेवाईक राजू कृष्णा बडगुजर यांच्या तक्रारीवरुन विठ्ठल मोहकर व त्यांचा मुलगा दिपक मोहकर यांच्याविरुध्द धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. जळगाव जिल्हा न्यायालयात जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस.आर.पवार यांच्या न्यायालयात हा खटला चालला. यात सरकारपक्षातर्फे एकूण १४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्याअंती न्या. एस.आर.पवार यांनी आरोपी विठ्ठल मोहकर यांना २ वर्ष सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व भारतीय शस्त्र अधिनियमाचे कलम ३० नुसार ६ महिने साध्या कारवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती तर आरोपी क्रमांक २ दिपक मोहकर याची सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. सरकारपक्षातर्फे अतिरिक्त शासकीय अभियोक्ता ॲड रमाकांत सोनवणे यांनी काम पाहिले तर, पैरवी अधिकारी म्हणून हर्षवधन सपकाळे यांनी सहकार्य केले.