यावल, प्रतिनिधी | येथील सार्वजनिक बांधकाम विभागातून वाहनचालक म्हणून ३६ वर्षाच्या सेवेनंतर व गेल्या आठ महीन्यापुर्वी सेवानिवृत्त झालेले येथील कर्मचारी हरिश्चंद्र संपत भोईटे यांना सेवानिवृत्तीच्या पश्चात मिळणा-या रकमांसाठी जळगाव येथील सार्व. बांधकाम विभागात चकरा माराव्या लागतात. भोईटे सतत आजारी राहत असल्याने त्यांच्या कुटूंबियाची हेळसांड होत असून सेवानिवृत्तीचे सर्व लाभ तात्काळ न दिल्यास भोर्इंटे सह कुटूंबयांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे.
या संदर्भातील वृत असे, यावलच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जळगाव येथील मुख्य कार्यालयात येथील हरिश्चंद्र संपत भोईटे हे वाहनचालक म्हणून गेल्या आठ महीन्यापुर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. ग्रॅच्युईटी, रोखीचे रजेच्या रकमा ,पेन्शन विक्रीच्या रकमा, व इतर रकमासाठी भोईटे आठ महीन्यापासून कार्यालयाचे उंबरठे झीजवत आहेत. मात्र अधिकारी वर्गासह संबधित कर्मचारी त्यांना फिरवत आहेत. हक्काची रक्कम मिळत नसल्याने ते विवंचनेत सापडलेले आहेत. भोईटे यांचा अपघातात डोक्याला मार लागल्याने त्यांच्या डोक्यावर मार लागलेला असल्याने त्यांचेवर अजूनही महागडे उपचार सुरू आहेत. गुरूवारी भोईटे कुटूंबियांनी कार्यालयासह संबधितांना निवेदने देवून पंधरा दिवसाचे आत त्यांच्या रक्कम दिल्या नाहीत तर जळगाव येथील मुख्य कार्यालयासमोर कुटुंबासह आत्मदहन करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रती अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग जळगाव, जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांना दिल्या आहेत.