सूर्योदय तर्फे दोन दिवसीय ऑनलाईन कविसंमेलन

 

जळगाव, प्रतिनिधी । सूर्योदय सर्वसमावेशक मंडळाच्या नाशिक शाखेच्या वतीने मंडळाच्या अठराव्या वर्धापन दिनानिमीत्त येत्या शनिवार व रविवार रोजी गुगलमीटद्वारा ऑनलाईन कविसंमेलन आयोजित करण्यात आले आहे .

शनिवार दि. २७ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता आयोजित कविसंमेलनात नीलम माणगावे- जयसिंगपूर ,अंजली कुलकर्णी- पुणे,  एकनाथ आव्हाड- मुंबई ,सौ माया दिलीप धुप्पड -जळगाव ,भारती डिग्गीकर- मुंबई ,संजय वाघ- नाशिक , दुर्गेश सोनार- मुंबई,अनिल पाटील- जळगाव , राजेंद्र दिघे- मालेगाव  यांचे काव्यवाचन होणार असून राज्य शासनाचा बालकवी पुरस्कार प्राप्त  सुप्रसिद्ध कवी विलास मोरे-एरंडोल  हे सूत्रसंचालन करतील.

Google Meet वर मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी, या लिंकवर क्‍लिक करा: https://meet.google.com/jgi-xnbi-nna

रविवार दि २८ मार्च रोजी सायंकाळी ४ वाजता  आयोजित कविसंमेलनात अशोक नीलकंठ सोनवणे-चोपडा, उत्तम कोळगावकर- नाशिक,  शशिकांत हिंगोणेकर- जळगाव, प्रा  वा ना आंधळे- एरंडोल, प्रा बी एन चौधरी- धरणगाव,रमेश सरकाटे- भुसावळ, डाॅ संजीवकुमार सोनवणे- धरणगाव, राजेंद्र रायसिंग- जळगाव, जितेंद्र कुवर – जळगाव यांचे काव्यवाचन होणार असून अनिल शिंदे- जळगाव हे सूत्रसंचालन करतील.

Google Meet वर मीटिंगमध्ये सामील होण्यासाठी, या लिंकवर क्‍लिक करा: https://meet.google.com/uhy-uuui-cmo

तरी काव्यरसिकांनी कविसंमेलनाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष सतीश जैन, नाशिक शहराध्यक्ष सावळीराम तिदमे व पदाधिकारींनी केले आहे.

 

Protected Content