Home राज्य सुशांत संघर्ष करणारा होता, तो आत्महत्या करूच शकत नाही : अंकिता लोखंडे

सुशांत संघर्ष करणारा होता, तो आत्महत्या करूच शकत नाही : अंकिता लोखंडे


मुंबई (वृत्तसंस्था) सुशांतला जेवढं मी ओळखते, मी सांगू शकते तो एवढा दुबळा माणूस नव्हता. शून्यातून साम्राज्य उभारण्याची त्याच्यात ताकद होती आणि त्याच्यात ते टॅलेंट होते. सुशांत संघर्ष करणारा होता. तो इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल, अशी प्रतिक्रिया त्याची मैत्रिण अभिनेत्री अंकिता लोखंडेने दिली आहे.

 

‘झी न्यूज’ला दिलेल्या मुलाखतीत अंकिता म्हणाली की, सुशांत इतका कमजोर नव्हता की तो आत्महत्या करेल. यावर विश्वास नाही. आम्ही अजुनही या धक्क्यामध्ये आहोत. मी कोणावरही आरोप करत नाहीय. परंतू खरोखर काय झाले ते मला जाणून घ्यायचे आहे, असे काय झाले? सुशांत एक चांगला माणूस होता. तो कधी नाराज होत नसे. कौटुंबिक कारणामुळे किंवा फिल्म इंडस्ट्रीतील वाद यामुळे त्यांने आत्महत्या केली असे म्हणणे योग्य होणार नाही, असेही अंकिता म्हणाली. सुशांत संघर्ष करणारा होता. तो पळणारा किंवा पराभूत होणारी व्यक्ती नव्हती. तो नेहमी म्हणायचा, जर यश मिळाले नाही तर शेती करेन. लघुपट करेन. म्हणून तो कधीही आत्महत्या करेल यावर विश्वास बसत नाही.


Protected Content

Play sound