जळगाव प्रतिनिधी । सुप्रिम कॉलनी येथील माहेर असलेल्या ३५ वर्षीय विवाहितेला जामनेर तालुक्यातील नाचणखेडा येथील पतीसह सासरकडील चौघांनी ५० हजार रूपयांची शारिरीक व मानसिक छळ केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंजूम नयुम पटेल (वय-३५) ह.मु. सुप्रिम कॉलनी यांचा सन २०१६ मध्ये नयुम दादामिया पटेल रा.नाचणखेडा ता. जामनेर यांच्याशी विवाह झाला. लग्नानंतर सुरूवातीचे दोन महिने आनंदाने गेले. त्यानंतर पती नयुम पटेल यांनी मोटारसायकल घेण्यासाठी पत्नीने माहेरहून ५० हजार रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. सासरचे मंडळी सासू नजमा दादामिया पटेल, हमीद दादमिया पटेल, बिलकीस लुकमान पटेल रा. नाचण खेडा यांनी देखील पतीला पाठबळ दिले. विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील करीत आहे.