रावेर प्रतिनिधी । सुकी मध्यम प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या कामांची माहिती देण्यास जलसंपदाचे उप कार्यकारी अभियंता टाळाटाळ करीत असल्याने या सुरु असलेल्या कामांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह निर्माण होत असून सुरु असलेल्या २५ लाखाच्या कामांमध्ये काहीतरी गौडबंगाल होत असल्याचा संशय उपस्थित होत आहे
याबाबत माहिती अशी की, सुकी मध्य प्रकल्प देखभाल दुरुस्तीचे कामे सुरु असून या मध्ये दुरुस्ती,काँक्रीटीकरण, डाव्या-उजव्या कालव्याची पाटचार्यांची साफ-सफाई आदी कामे सुरु आहेत. ही कामे येथील उपविभागीय अभियंता यांच्या मर्जीतील ठेकेदार आहे. हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे होत असून मार्च एन्डचे बिल काढण्याच्या घाई-घाईत थातुर-मातुर सुरु आहे तसेच या मध्यम प्रकल्पाचे उप कार्यकारी अभियंता कामांची माहिती दडपत असल्याने यामुळे येथे काही गौडबंगाल तर झाले नाही याचा जास्त संशय वाढत आहे. या सुरु असलेल्या कामांकडे जलसंपदा विभाचे कार्यकारी अभियंता यांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.