सीए परिक्षेत जाफर हुसेनचे यश

सावदा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चार्टर्ड अकाऊंटन्ट परिक्षेत जाफर हुसेन शब्बीर हुसेन याचे यश संपादन केले असून त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील हाजी अख्तर हुसेन इमदाद अली पेट्रोल पंपचे संचालक शब्बीर हुसेन हाजी अख्तर हुसेन बोहरी उर्फ बाबू शेठ यांचा मुलगा जाफर हुसेन शब्बीर हुसेन याने नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेत यश संपादित केले आहे. जाफर हुसेनला त्याची आत्या डॉ.शेहरबानो हाजी अख्तर हुसेन यांचे मार्गदर्शन लाभले आहे. जाफर बोहरी याने चार्टर्ड अकाउंटन्ट  परीक्षेत यश मिळवल्याने त्याचे मित्र मंडळी सह कुटुंबीयांनी कौतुक केले आहे.

Protected Content