नवी दिल्ली (वृत्तसंस्था) नागरिकत्व कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) विरोधात जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान एका माथेफिरू तरुणाने गोळीबार केला. यात एक आंदोलक विद्यार्थी जखमी गंभीर झाला आहे.
आंदोलन सुरू असताना एक अज्ञात अचानक आला आणि त्याने पिस्तूल काढून आंदोलकांच्या दिशेने फायरिंग केली. यात शादाब नावाचा तरुण जखमी झाला. गोळीबार करणारा व्यक्ती पोलीस आणि माध्यमांना धमकवण्याचा प्रयत्न करत होता. मी सर्वांना आझादी देईल, भारत माता की जय, दिल्ली पोलिस जिंदाबाद, वंदे मातरम् अशा घोषणा दिल्याचे वृत्त आहे. हा तरुण खुलेआम बंदूक घेऊन जात असल्याचे पाहूनही पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. दिल्ली पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आला आहे.