सीएएला समर्थन दिलेले नाही : राज ठाकरे

Raj 2

 

मुंबई (वृत्तसंस्था) माझे सुधारित नागरिकत्व कायद्याला अर्थात सीएएला समर्थन नसून बेकायदा पाकिस्तानी, बांगलादेशी मुसलमानांना हाकला असे म्हणालो होतो. पण याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी म्हटले आहे. एवढेच नव्हे तर, आपल्या वक्तव्याच्या प्रसारमाध्यमांकडून चुकीचा अर्थ लावण्यात आल्याचेही राज यांनी स्पष्ट केले आहे.

 

राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली होती. सीएए आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणीला (एनआरसी) पाठिंबा देण्यासंबंधी मनसे पदाधिकाऱ्यांमध्ये मतांतर असून नेमकी भूमिका स्पष्ट करण्यासाठीच ही बैठक बोलावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, बाहेरून आलेल्यांना कशासाठी पोसायचे, असा सवाल करीत बांगलादेशी व पाकिस्तानी घुसखोरी हाकलण्यासाठी केंद्राला पाठिंबा देण्याची आपली तयारी असल्याचे राज यांनी सांगितले होते. भारत ही धर्मशाळा नाही. त्यामुळे येथे पाकिस्तान आणि बांगलादेशातून येणाऱ्या मुसलमानांना हाकलूनच दिले पाहिजे. सध्या जे काही लोक मोर्चे काढत आहेत त्यांना मोर्चा काढूनच उत्तर दिले जाईल, असे सांगत ९ फेब्रुवारी रोजी मनसेच्या मोर्चाची घोषणा राज ठाकरे यांनी केली होती. परंतू आता सीएएला समर्थन दिलेले नाही,असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.

Protected Content