जळगाव प्रतिनिधी । कोरोनाच्या काळात सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे. आता सध्या जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गर्दींचे ठिकाणे बंद करण्याचे आदेश सोमवारी जिल्हाधिकारी यांनी दिले आहे. यात सिनेमागृहांना देखील फटका बसला असून किमान ५० टक्के उपस्थितीसाठी शासनाने परवानगी द्यावी, अशी मागणी जळगाव जिल्हा चित्रपट प्रदर्शक संघाचे जिल्हाध्यक्ष महेंद्र लुंकड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सध्या राज्यात कोरोनाची दुसरी लाट असल्याचे बोलले जात आहे. यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारी म्हणून शाळा, महाविद्यालये, मंगलकार्यालये गर्दीचे ठिकाणे बंद केली. दरम्यान, सुरूवातील लॉकडाऊनच्या काळात चित्रपटगृह व्यवसायिकांनाही मोठा फटका बसला होता. ऑक्टोबर २०२० पासून नियमानुसार ५० टक्के सवलत असल्यामुळे ग्राहकांची उपस्थितीची परवानगी देण्यात आली होती. सध्या कोरोनामुळे सर्व धंदे बंद असल्यामुळे चित्रपटगृह चालविणे अवघड झाले आहे. सिनेमागृह सुरू ठेवण्यासाठी परवानगी द्यावी यासाठी चित्रपट संघाने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची भेट घेवून सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी राजकमल टॉकीजचे महेंद्र लुंकड, पीव्हीआर सिनेमागृहाचे आकाश सिंग, आयनॉक्सचे वैभव शहा, अशोक थिएटरचे इंद्रवर्धन त्रिवेदी आदींनी भेट घेतली. यासंदर्भात येत्या सात दिवसात निर्णय घेवू असे आश्वासन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.
https://www.facebook.com/508992935887325/videos/910035703141780