बंगळुरू-वृत्तसंस्था | कर्नाटकात आज सिध्दारमैय्या यांनी मुख्यमंत्री तर डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. याप्रसंगी कॉंग्रेसने जोरदार शक्ती प्रदर्शन केले.
सिद्धरामय्या यांनी आज कर्नाटकात दुसर्यांदा मुख्यमंत्री म्हणून, तर डीके शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. हा शपथविधी सोहळा बेंगळुरूच्या कांतीराव स्टेडियमवर पार पडला. अलीकडेच कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. यात कॉंग्रेस पक्षाने दणदणीत विजय संपादन केला होता. कॉंग्रेसनं १३५, भाजपनं ६६ आणि जेडीएसनं १९ जागा जिंकल्या आहेत. यामुळे कॉंग्रेसला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे अधोरेखीत झाले होते.
दरम्यान, कॉंग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या दाव्यावरून सिद्धरामय्या आणि डीके शिवकुमार यांच्यातील संघर्ष अनेक दिवस सुरू होता. अखेर त्यांचे मनोमीलन झाल्याचे आज शपथविधी पार पडला. आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यासोबत जी परमेश्वर, एम. बी. पाटील, सतीश जारकीहोळी, प्रियंक खर्गे यांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली.
यासोबतच राहुल गांधी यांनी १ ते २ तासात कर्नाटकचे नव्या सरकारची पहिली कॅबिनेट मिटींग होईल आणि त्यामध्ये आम्ही जी पाच आश्वासन दिली आहेत ते कायदा बनतील असं सांगितलं. राहुल गांधी म्हणले की, मागील पाच वर्षांपासून तुम्हाला काय अडचणी आल्या हे तुम्हा आणि आम्ही देखील जाणतो. मीडियामध्ये देखील कॉंग्रेस का जिंकली ते सांगण्यात येत आहे. या विजयाचं कारण फक्त एक खारण आहेत आणि ते म्हणजे कॉंग्रेस पक्ष गरीब, दलित आणि मागासलेल्या नागरिकांसोबत उभा राहीला. आम्ही प्रेमाने द्वेशावर विजय मिळवला. द्वेषाच्या बाजारात कर्नाटकमध्ये प्रेमाचं दुकान उघडलं आहे.