सिडकोच्या २ हजार कोटी रुपयांच्या कामात अनियमितता : कॅगचा अहवाल

 

मुंबई (वृत्तसंस्था) भाजप सरकारच्या काळातील सिडकोच्या तब्बल २ हजार कोटी रुपयांच्या कामात अनियमितता असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. ‘कॅग’चा बहुप्रतिक्षित अहवाल आज अखेर विधानसभेत सादर करण्यात आला.

‘कॅग’च्या अहवालात अनेक गंभीर गोष्टी सांगण्यात आल्या आहेत्त. त्यात प्रामुख्याने नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील कामात टेकडी कापण्यासाठी २०३३ कोटी देण्यात आले. त्याच टेकडीपासून निघालेल्या दगडांनी भरणी करून २२.०८ कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखवण्यात आले. तर कामाच्या विलंबासाठी कंत्राटदाराकडून १८६ कोटी वसुल करायला हवे होते. मात्र, सिडकोने ते वसूल केले नाहीत. कॅग अहवालात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, नेरुळ-उरण रेल्वे प्रकल्पात अनियमिततेचा ठपका ठेवला आहे. ५० कोटी पेक्षा जास्त कामाच्या १६ निविदा राष्ट्रीय स्तरावरील वर्तमानपत्रात जाहिराती न देता काढता देण्यात आल्या. ८९० कोटीची कामे अनुभव नसलेल्या कंत्राटदारांना देण्यात आली. त्यांच्याकडे या कामाचा कोणताही अनुभव नव्हता. ४३० कोटी रुपयांच्या १० कामात निविदांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करण्यात आले. यातील ७० कोटीची अतिरिक्त कामे निविदा न मागवता देण्यात आली. त्यात पारदर्शकता नव्हती. १५ कोटी पेक्षा जास्त किमतीची सात कामे देताना तांत्रिक मूल्यांकन करताना गोंधळ होता. कॅगच्या या अहवालामुळे भाजप अडचणीत सापडली आहे.

Protected Content