Home क्राईम सिंधी कॉलनीतून ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी

सिंधी कॉलनीतून ट्रॅक्टरच्या बॅटरीची चोरी

0
104

जळगाव प्रतिनिधी । शहरातील सिंधी कॉलनी परिसरात उभ्या ट्रॅक्टरचे ८ हजार रूपये किंमतीची बॅटरी चोरीस गेल्याचे उघडकीला आले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप शिवप्रकाश चांगरे (वय- ६०) हे नवल कॉलनी शिंधी कॉलनी शेजारी, जळगाव इथं आपल्या कुटुंबीयांसह राहतात. चांगरे हे शेती काम करून उदरनिर्वाह करतात. त्यांच्याकडे शेतीसाठी ट्रॅक्टर आहे. दरम्यान १९ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर त्यांनी घरासमोर ट्रक्टर पार्किंग करून लावले होते. अज्ञात चोरट्यांनी ८ हजार रुपये किंमतीची ट्रॅक्टरची एक्साइड कंपनीची बॅटरी चोरून नेल्याचे उघडकीला आले आहे.

याप्रकरणी दिलीप चांगरी यांनी मंगळवार, दि.२३ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता अज्ञात चोरट्यांविरोधात तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक इम्रान सय्यद करीत आहे.


Protected Content

Play sound