जळगाव प्रतिनिधी । बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या यांना गोरजाबाई जिमखान्यात काल गुरुवारी रात्री 5 ते 6 जणांनी बेदम मारहाण केली होती. याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह इतरांवर शहर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारेकऱ्यांनी लांबविलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर आज पोलीसांनी घटनास्थळावरून जप्त केले असून त्यात साहित्या यांना मारतांना माजी महापौर ललित कोल्हेंसह इतर साथीदार स्पष्टपणे दिसून आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी पत्रकारांशी बोलतांना दिली आहे.
गोरजाबाई जिमखान्यात अनेक प्रतिष्ठित नागरिक व्यायाम, इतर खेळ खेळण्यासाठी येतात. बांधकाम व्यावसायिक खुबचंद साहित्या हे सुद्धा गुरूवारी सायंकाळी आले होते. दरम्यान, रात्री ८.३० वाजेच्या सुमारास माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह 5 ते 6 जणांनी येवून साहित्या यांना बेदम मारहाण केली. यात ते गंभीररित्या जखमी झाले. माजी महापौर ललित कोल्हे यांच्यासह 5-6 जणांच्या टोळक्यानेच ही मारहाण केल्याचा आरोप त्यांचा मुलगा नितीन साहित्या यांनी केला कालच केला होता. दरम्यान, मारेकऱ्यांनी लांबविलेले सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर आज पोलीसांनी घटनास्थळाजवळून एका झुडपात सापडले. डीव्हीआरमधील चित्रीकरण बघितले असता त्यात माजी महापौर ललित कोल्हेंसह इतर साथीदार साहित्या यांना मारतांना स्पष्टपणे दिसून आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. दरम्यान, शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरूण निकम यांनी देखील या माहितीला दुजोरा दिला आहे. याप्रकरणी माजी महापौर ललित कोल्हेंसह इतर साथीदार यांच्या विरोधात शहर पोलीसात 307, 384, 406, 143, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यापुर्वी देखील त्यांच्यावर हल्ला करण्यात आला होत, असा आरोपी देखील खुबचंद साहित्या यांनी केला होता. दरम्यान आपल्यावर हल्ला होणार आहे. याबाबत पोलीसांना वारंवार तक्रार करूनही पोलीस अधिकारी साफ दुर्लक्ष्ा करीत असल्याचा आरोपही साहित्यांनी केला. यापुर्वी 8 महिन्या आगोदरही माझ्यावर अपघात करून जीवे ठार मारण्याचा कट रचण्यात आला होता. मात्र त्यावेळी देखील सुदैवाने कारच्या एअर बॅग्जमुळे बाचावले होते. दरम्यान जखमी आवस्थेत त्यांना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.