Home Cities पारोळा सावरखेडे धरणात तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

सावरखेडे धरणात तरुण शेतकर्‍याचा मृत्यू

0
39


shetkari

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यातील सावरखेडे येथील शेतकरी बंधार्‍यात बेपत्ता झाला असून आज सकाळी त्यांचा मृतदेह आढळून आला आहे.

याबाबत वृत्त असे की, संदीप विष्णू पाटील ( वय ३१, रा. शिवरे ता. पारोळा) हा तरुण शेतकरी आपल्या शेतात शेतपिकांना पाणी भरण्यासाठी सावरखेडे धरणात मोटर (जलपरी) सोडण्यासाठी काका व चुलतभावासह पोहत खोल पाण्यात व धरणाच्या मध्यात गेला होता. मोटार सोडून तिची वायर सोबत पोहत घेऊन येत असताना तो अर्ध्यावरच बेपत्ता झाला. दरम्यान त्याचा शोध घेण्यासाठी शिवरे,सावरखेडे, आडगाव तामसवाडी येथील आसंख्य तरुणांनी धरणात दोन अडीच तास प्रयत्न केले. परंतु अंधार पडल्याने ही शोध थांबवण्यात आली आहे. आज पुन्हा शोध मोहीम राबविण्यात आली. यात त्यांचा मृतदेह आढळून आला.

बेपत्ता तरुण हा विवाहित असून त्याला दोन मुले, पत्नी, आई वडील, एक भाऊ आस त्याचा पश्‍चात परिवार आहे. या घटनेमुळे शिवरे गावात शोककळा पसरली आहे.


Protected Content

Play sound