Home राजकीय सावरकरांना भारतरत्न जाहीर न केल्यामुळे राऊतांची टीका

सावरकरांना भारतरत्न जाहीर न केल्यामुळे राऊतांची टीका

0
48

मुंबई प्रतिनिधी । भारतरत्न पुरस्कारार्थींमध्ये स्वातंत्र्यवीर सावकर यांचे नाव नसल्यामुळे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

सरकारकडून जाहीर झालेल्या भारतरत्न पुरस्कारावर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला आहे. भारतरत्न पुरस्कारात स्वातंत्र्यवीर सावरकरांना डावलण्यात आल्याबद्दल त्यांनी ट्विटच्या माध्यमातून भाजपवर निशाणा साधला आहे. वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी आले असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. भारतरत्न नककी कुणाला? आज नानाजी देशमुख, भुपेश हजारीका आणी प्रणव मुखर्जी यांना भारतरत्न बनवले. वीर सावरकरांच्या नशिबी पुन्हा काळे पाणी. शेम शेम असे राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. विनायका प्राण तळमळला असे म्हणून त्यांनी भाजपवर टीका केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound