सावदा, ता. रावेर प्रतिनिधी । आज रात्री उशीरा आलेल्या रिपोर्टमध्ये शहरातील तब्बल ११ जण कोरोना पॉझिटीव्ह आले असून हे रूग्ण आधी मयत झालेल्या कोरोना बाधीतांच्या कुटुंबातील असल्याची माहिती समोर आली आहे.
याबाबत माहिती अशी की, शहरातील संभाजी चौक परिसरातील एका कोरोना पॉझिटीव्ह रूग्णाचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्याच्या कुटुंबियांना क्वॉरंटाईन करून त्यांचे स्वॅब सँपल घेण्यात आले होते. आज रात्री उशीरा यातील नऊ जण कोरोना बाधीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. तर गवतबाजार परिसरातील मृत कोरोना बाधीत महिलेच्या कुटुंबातील दोन जणांनाही कोरोनाची बाधा झालेली आहे. यामुळे आज रात्री उशीरा शहरात अकरा कोरोना बाधीत आढळून आले असून या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी व वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश मराठे यांनी दुजोरा दिला आहे.