सावदा ता. रावेर प्रतिनिधी | शहरातील हद्दवाढ झालेल्या सोमेश्वर नगर भागात पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्याच्या कामास नगराध्यक्षा अनिता येवले यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला.
नगरपालिकांना नव्याने विस्तारलेल्या सिमाक्षेत्रांमध्ये नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजनेंतर्गत येथील सोमेश्वर भागात पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली. या कामकाज करण्यासाठी सावदा नगरपरिषद सर्वसाधारण सभेची मंजुरी घेऊन त्यास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, विभाग जळगाव यांची तांत्रिक मंजुरी जिल्हाधिकारी जळगाव यांची प्रशासकीय मान्यता घेऊन ई निविदा करुन कामाचे आदेश देण्यात आलेले आहे. नगराध्यक्षा अनिता येवले, नगरसेविका मीनाक्षी कोल्हे, विजया जावळे, माजी उपनगराध्यक्ष तथा नगरसेविका नंदाबाई लोखंडे, शबाना तडवी, लीना चौधरी, जयश्री नेहेते, मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पाणीपुरवठा निरीक्षक अभियंता जितेश पाटील, अविनाश पाटील ,राष्ट्रवादी पक्षाचे शहर अध्यक्ष कुशल जावळे परिसरातील नागरिक उपस्थित होते. नवीन हद्दवाढ झालेल्या भागात पाणीपुरवठा, रस्ते, गटारी, स्वच्छता आदी नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगराध्यक्षा अनिता येवले व सर्व नगरसेवक कटिबद्ध असल्याचे यावेळी सांगण्यात आले.या पाईप लाईन मुळे या परिसरातील पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होईल व परिसरातील नागरिकांना मुबलक पुरेसे पाणी मिळेल.