सावदा, ता. रावेर जितेंद्र कुलकर्णी । आजवर कोरोनाचा संसर्ग आढळून न आलेल्या सावदा शहरात आज एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने खळबळ उडाली असून प्रशासकीय यंत्रणेने संबंधीत महिलेच्या वास्तव्याचा परिसर सील करण्याची तयारी सुरू केली आहे.
याबाबत वृत्त असे की, सावदा येथे आजवर कोरोनाचा संसर्ग झाला नव्हता. काही दिवसांपूर्वी हिंगोणा गावातील महिलेचे शहरातील एका खासगी रूग्णालयात उपचार घेतांना निधन झाले होते. मात्र तिचा रिपोर्ट देखील निगेटीव्ह आला होता. तथापि, आज मात्र एका महिलेचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला असून याला मुख्याधिकार्यांनी दुजोरा दिला आहे. तर या महिलेचा वास्तव्य असणार्या परिसरात फवारणीचे काम सुरू असून हा परिसर सील करण्यात येणार आहे.