सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। सावदा येथील प्लॉट एरियात राहणाऱ्या एकाच कुटुंबातील ९ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरातील प्लॉट एरियात आज सकाळी ८२ वर्षीय वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यांच्या संपर्कातील त्यांच्याच कुटुंबातील तब्बल नऊ जणांचा कोरोना अहवाल आज दुपारी पॉझिटीव्ह आला आहे. एकाच कुटुंबातील नऊ जणांचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्याने सावदा शहरात खळबळ उडाली आहे. आढळून आलेल्या रूग्णांमध्ये तीन महिला, ४ अल्पवयीन मुले आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. सावदा शहरात एकुण रूग्ण संख्या ७२ वर पोहचली आहे. त्यापैकी ९ जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर १४ जण उपचार घेत आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.