सावदा प्रतिनिधी । आठवड्यापुर्वी सावदा येथील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालक कोरोनाबाधित आढळला होता. त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅब घेवून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आज त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून त्यापैकी एकाच कुटंबातील चौघांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. कालपर्यंत कोरोना बाधितांचा आकडा ३२ वर होता. आज नव्याने चार रूग्णांची भर पडली असून एकुण ३६ कोरोनाबाधित झाले आहे. शहरातील एका ट्रान्सपोर्ट कंपनीच्या संचालक कोरोनाबाधित आढळून आला होता. खबरदारीम्हणून सावदातील आरोग्य प्रशासनाने संपर्कातील नातेवाईकांचे स्वॅब घेवून होम क्वारंटाईन करण्यात आले होते. आज सर्वांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला असून एकाच कुटुंबातील चार जण कोरोना बाधित असल्याचे निष्पन्न झाले. यात तीन महिला तर एक पुरूषाचा समावेश आहे. सावद्यात एकुण कोरोना बाधित ३६ झाले असून त्यापैकी सहा जणांचा मृत्यू तर उर्वरित ३० जणांवर कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहे. पालिकेचे मुख्याधिकारी सौरभ जोशी आणि आरोग्य अधिकारी गणेश मराठे यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.