सावदा, प्रतिनिधी | शहरातील देवकरवाडा भागात भाड्याच्या घरात राहणाऱ्या ४३ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली झाली आहे. सावदा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, सावदा येथील देवकरवाडा येथे भूषण दत्तात्रय महाजन ( वय ४३, मूळ रा. खिर्ची ता. रावेर) हा शरद कुरकुरे यांच्या घरात भाड्याने राहता होता. त्याने दि. ९ रोजी सकाळी ८ ते दुपारी ३.३० वाजेच्या दरम्यान भाड्याच्या घरात किचनमध्ये छतास असलेल्या लोखंडी हुकाला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. हर्षल प्रकाश इंगळे (रा. खंडेराववाडी, फैजपूर ता. यावल) याच्या खबरीनुसार सावदा पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली हेपोकॉ उमेश पाटील हे करीत आहे.


