सावदा, प्रतिनिधी । येथील चार दिवसापूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तीचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आल्याने सावदा येथील शारदा चौक सील करण्यात आलेला आहे. या वृत्तास सावदा येथील मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा येथील मृत व्यक्ती ही पाचवा पॉझिटिव आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला आहे, श्री महानुभाव मंदिर परिसर, साळी बाग, म.गांधी चौक हा परिसर आधीच सील करण्यात आला आहे. आता शारदा चौक परिसरात हायपो सोडियम क्लोराईड ची फवारणी करण्यात येत असून खबरदारीचा उपाय म्हणून सील करण्यात आला आहे. घराबाहेर न पाडण्याचे आवाहन नागरपालिका व पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. विनाकारण रस्यावर फिरू नये व गर्दी करू नये असेही आवाहन करण्यात येत आहे. सावदा शहरात कोरोना संसर्गामुळे पाच जणांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे.