सावदा, प्रतिनिधी । येथे पुरातन खाजगी राम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या थाटाने साजरा येत असतो परंतु, कोरोनाच्या पार्श्वमभूमीवर राम जन्मोत्सव आज अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
प्रत्येकवर्षी मोठ्या थाटामाटात श्रीराम जन्मोत्सव करण्यात येतो. मात्र, कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी काळात गर्दी न करता दुपारी बारा वाजता चार भाविकांच्या उपस्थितीत अभिषेक व आरती करून श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. संध्याकाळी निघणारी पालखी मिरवणूक रद्द करण्यात आली आहे. आज राम जन्मस्थळची आरती अभिजित मिटकर व स्वरा अभिजीत मिटकर यांनी त्यांच्यासोबत ग्राम मंदिरचे पुजारी मुरलीधर नम्र व मोहीनी नम्र व शशीकांत ओवे व सुवर्णा ओवे उपस्थित होते.