सावदा प्रतिनिधी । सावदा कोवीड सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचा तपासणी अहवाला आज प्रशासनाला प्राप्त झाला असून त्यात दोन रूग्ण पॉझिटीव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे. यातील एकाचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दिली आहे.
सावदा शहरात कोरोनाच्या रूग्णांची संख्या आता ५१ वर पोहचली आहे. सावदा कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या अहवालात आज दोन रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आले आहे. दोन्ही रूग्ण सावदा शहरातील असून आज एकाचा मृत्यू झाला तर दुसरा शहरातील गांधी मार्केट परिसरातील आहे. एकुण आकडा लक्षात घेतला ५१ पैकी ९ जणांची मृत्यू, ६ जण उपचार तर ३६ रूग्णांनी कोरोनावर मात करू घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी सांगितले.