सावदा, प्रतिनिधी । सावदा पोलिसांनी शनिवार दि. ९ मे रोजी झन्ना मन्ना खेळतांना तिघांना अटक करून त्यांचावर गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या कारवाईत ८ ते १० जण फरार होण्यात यशस्वी झाले आहेत.
शनिवार ९ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास कुसुंबा रोडने जलालशाह बाबा दर्गाच्या मागील बाजूस सार्जनिक ठिकाणी ५२ पत्त्यांचा झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळतांना काही व्यक्ती आढळून आलेत. पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असता ८ ते १० आरोपी पळून जाण्यात यशस्वी झालेत. तर तिघांना पकडण्यात यश आले. यात तौसीफ शेख मोहम्मद (वय ३० रा. नागझिरी ), राजेंद्र रोहीदाद वाघ (वय ४० रा. उटखेडा) व मनोज जयराम महाजन (वय ४० रा. निबोल) यांना अटक करण्यात आली. या पकडलेल्या आरोपींकडून ११ हजार ८७० रुपये रोख तर १ लाख १० हजार रुपये किमतीच्या ५ मोटरसायकली अशा एकूण १ लाख २१ हजार ८७० रुपये मिळून आले. या गुन्हाचा खबरी रिपोर्ट पाठविला असून वरिष्ठांना बिनतारी संदेशने माहिती पुरविण्यात आली. सपोनि नेरी यांच्या आदेशानुसार गुन्ह्याचा पुढील तपास पोहेकॉ युसुफ तडवी करीत आहे. ही कारवाई सपोनि इंगोले, पो उप निरीक्षक पवार पोना तडवी, पोका कुरकुरे, पोका मोहसीन पठाण, पोका विशाल खैरनार यांच्या पथकाने केली.