सावदा ता.रावेर (प्रतिनिधी)। सावदा कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅब तपासणीचे अहवाल आज प्राप्त झाले असून त्यात शहरातील पाच रूग्ण पॉझिटीव्ह आल्याचे निष्पन्न झाले आहे. कोरोनाबाधितांचा आकडा ८३ वर पोहचला आहे. यावृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.
सावदा शहरात कोवीड रूग्णांची संख्या आता वाढत आहे. कोवीड केअर सेंटरने पाठविलेल्या स्वॅबचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहेत. त्यात पाच रूग्ण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहे. आढळून आलेल्यांमध्ये बसस्थानकाजवळ असलेल्या डेअरी जवळ-१, क्रांती चौक-१, मोठा आड भागातील एक महिला व दोन मुले असे पाच रूग्ण आहे. सावदा आता एकुण ८३ रूग्ण बाधित असून त्यापैकी दहा जणांचा मृत्यू झाला तर २३ जण उपचार घेत आहे. या वृत्ताला मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी दुजोरा दिला आहे.