सावदा जलशुध्दीकरण केंद्राचे भारनियमन बंद करा; महाविरणला निवेदन

सावदा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । सावदा शहराचा जलशुद्धीकरण केंद्राचे विद्युत भारनियमन बंद करावे, अशी मागणीचे निवेदन माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, माजी नगरसेवक फिरोज खान पठाण यांनी यांनी सावदा येथील महावितरण विभागाला देण्यात आले.

 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सावदा शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी हतूनर जलाशयातील मुक्ताई जलाशयातून पाणी हे मंगलवाडी गावातील हेड-वर्क्सवरून पंपिंग करून सावदा शहरात आणले जाते.  त्यानुसार सावदा जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्धीकरण करून संपूर्ण शहरात विस्तारीकरण करण्यात येत असते. तथापी जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत भार नियमामुळे संपूर्ण शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झालेला आहे. सदर जलशुद्धीकरण केंद्राचे व मंगलवाडी हेड-वर्क्सचे विद्युत बिल सावदा नगर परिषदेमार्फत वेळोवेळी व मुदतीच्या आत अदा करण्यात येत आहे. सद्यस्थितीमध्ये उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी जास्त प्रमाणात आवश्‍यक आहे. त्यामुळे पाणीपुरवठा व अत्यावश्यक सेवेसाठी असताना जलशुद्धीकरण केंद्राचा व मंगलवाडी हेड-वर्क्सचा भारनियमन न करता विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवावा, मागणीचे निवेदन सावदा येथील महावितरण कार्यालयाच्या कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले. या निवेदनावर माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी व फिरोज खान पठाण यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

 

Protected Content