सावखेडा सीम परिसरात शेतात मका चोरीचा प्रयत्न‍; यावल पोलीसात गुन्हा दाखल

यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल तालुक्यातील सावखेडा सीम शिवारातील शेतातून मक्याचे कणस कापून चोरून नेण्याचा प्रयत्न उघडकीला आला आहे. याप्रकरणी सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

यावल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रमोद ब्रिजलाल पाटील वय 37 रा. सावखेडा सिम ता. यावल हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. त्यांचे सावखेडा शिवारातील शेत गट नंबर ६८-२ दोन मध्ये शेत आहे. त्या शेतात त्यांनी मक्याचे पिकांची लागवड केली आहे. सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता गावातील मुस्तफा छबु तडवी आणि शाहेब हुसेन तडवी यांच्यासह इतर तीन ते चार जणांनी शेतात जाऊन शेतातील मक्याचे कणीस कापून ते पोत्यात भरून चोरी करून जात असताना शेतकरी प्रमोद पाटील यांनी पाहिले. चोरट्यांनी शेतकरी प्रमोद पाटील यांना पाहताच कापलेले मका सोडून पसार झाले होते. या संदर्भात प्रमोद पाटील यांनी यावल पोलीस ठाण्यात सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजता यावल पोलीसात घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून संशयित आरोपी मुस्तफा तडवी, शोऐब तडवी यांच्यासह इतरांवर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय देवरे करीत आहे.

Protected Content