सावखेडा सिम येथील शेतमजुराची आत्महत्या

 

यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा सिम येथील एका शेत मजुराने गाव शिवारातील विहीरीत उडी घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याची पोलीसात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार. सावखेडा सिम तालुका यावल येथील राहणारे अनिल धुळकु पाटील यांनी सावखेडा सिम शिवारातील अजय दिलीप पाटील यांच्या शेतातील खोल विहीरीत उडी मारून पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मयत व्यक्ति अनिल पाटील (वय ४५ वर्ष) हे मंगळवार दि. १९ रोजी सकाळच्या ८ वाजे पासुन कुणालाही काही एक न सांगता घरातुन निघुन गेले होते. विविध ठीकाणी शोध घेतल्यावर पतीचा तपास लागला नाही म्हणुन त्यांची पत्नी प्रतिभा अनिल पाटील यांनी अनिल यांचे रायपुर येथील मोठे भाऊ शंकर यांना दुरध्वनीवरून सदरची माहीती कळविली. यावेळी अनिल यांचे मोठे भाऊ यांनी परीसरात पुनश्च शोध घेतले असता अनिल यांचा मृतदेह हे अजय पाटील यांच्या शेतातील विहीरीत आढळुन आला. याबाबत मयताचे मोठे भाऊ शंकर यांच्या खबरीवरून आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी मेहबुब् तडवी हे करीत आहे. मयताच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. बी. बी. बारेला यांनी केले. अनिल पाटील यांनी आत्महत्या का केली याचे कारण मात्र समजु शकले नाही.

Protected Content