जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडा शिवारात श्रावण लालचंद भिल (वय ४०) त्याच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून खून झाल्याची घटना बुधवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली.
दरम्यान संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळत असून घटनास्थळी सहायक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंता यांच्यासह पोलिसांचा ताफा दाखल झाला आहे. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला आहे.