यावल प्रतिनिधी । तालुक्यातील सावखेडासिम येथील एकाने कौटुबिक वादातून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना घडली. आत्महत्या करण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी यावल पोलीसात नोंद करण्यात आली आहे.
पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, गोकुळ किसन पाटील (वय-४४) रा. सावखेडा सिम ता.यावल यांनी आज दिनांक १८ मे रोजी सकाळी ११ .३० वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरातील छताला दोरी बांधुन गळफास घेवुन आत्महत्या केल्याची घटना घडली. चुलत भाऊ राजु शामराव पाटील यांनी खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत गोकुळ किसन पाटील याचे यावल ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी बी.बी.बारेला यांनी शवविच्छेदन केले.
दारूचे होते व्यसन
दरम्यान गोकुळ पाटील यांच्या आत्महत्याचे कारण समजले नाही. मात्र दारू पिण्याचे व्यसन होते, याच कारणामुळे त्याची पत्नी गेल्या काही वर्षापासून आपल्या एकुलत्या एक मुलाला घेवुन आपल्या आईकडे माहेरी राहात आहे. त्यामुळे कौटुंबीक वादामुळे तो अधिक प्रमाणावर दारूचे व्यवसन जडले होते. याप्रकरणी यावल पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील पोलीस कर्मचारी सिंकदर तडवी हे करीत आहे.