सावखेडा फाट्यावर झालेल्या ‘त्या’ भीषण अपघातप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी । लग्नाच्या कार्यक्रमात दुचाकीने जाणाऱ्या चौघांना भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत एक जण ठार तर ३ जखमी झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील किनोद गावाजवळील सावखेडा फाट्याजवळ घडली होती. या अपघात प्रकरणी मंगळवार १६ मे रोजी रात्री ८ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  ज्ञानेश्वर रामराव सपकाळे (वय-४१) रा. फुपणी ता.जि.जळगाव असे मयताचे नाव आहे.

 

जळगाव तालुक्यातील फुपणी येथील रहिवाशी ज्ञानेश्वर सपकाळे हे मंगळवारी १६ मे रोजी दुपारी १ वाजता आपल्या दुचाकी (एमएच १९ डीएल ७९३४) ने जळगाव शहरातील रिंगरोडवरील एका सभागृहात आयोजित नातेवाईकाकडील लग्नाला येत होते. त्यांच्यासोबत त्यांचे मित्र राजेंद्र रामचंद्र सोनवणे (वय.४८) हे डबल सीट होते तर दुसरी दुचाकी (एमएच १९ एएफ ९७०८) ने त्यांचा मोठा मुलगा डिगंबर ज्ञानेश्वर सपकाळे (वय-१९) आणि निलेश शांताराम निकम (वय-४५) हे दोघे सोबत होते. दोन्ही दुचाकीने फुफणी येथून निघाल्यानंतर किनोद गावाच्या पुढे सावखेडा फाट्यावर सावखेडाकडून येणाऱ्या एका ट्रॅक्टर (एमएच १९ एपी ७९३७) ने दोन्ही दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात ज्ञानेश्वर सपकाळे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवरील इतर तिघे गंभीर जखमी झाले. याप्रकरणी दिल्या तर शांताराम निकम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरवरील अज्ञात चालकाविरोधात जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अनिल फेगडे करीत आहे.

Protected Content