मुक्ताईनगर प्रतिनिधी । तालुक्यातील सारोळा येथील जलशुध्दीकरण केंद्राजवळ अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य असल्याच्या कारणाने नागरिकांच्या तक्रारीवरून आमदार चंद्रकांत पाटील व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता देवेंद्र लांडगे यांनी भेट दिली. लवकरात लवकर स्वच्छता करण्यात यावी, लोकांच्या जीवनाशी खेळणे बंद करा अशी तंबी अधिकाऱ्यांना व कंत्राटदारांना दिली.
याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील सारोळा येथील जलशुध्दीकरण केंद्रातून ५१ गावांना पाणीपुरवठा केला जातो. जलशुध्दीकरण केंद्राजवळ मोठ्या प्रमाणा अस्वच्छता आहे. त्याचप्रमाणे झाडेझुडपे व घाण साचली आहे. नागरिकांची याबाबत ओरड होती. तालुक्याचे आमदार चंद्रकांत पाटील, जीवन प्राधिकरणाचे अभियंता श्री. लांडगे यांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जावून या प्रकल्पाची पाहणी केली. येथे अस्वच्छता आणि घाण आढळून आल्याने आमदार पाटील हे अधिकाऱ्यांवर भडकले. तत्काळ हा परिसर स्वच्छ करण्यात यावा असे आदेश यांनी अधिकारी व कंत्राटदारांना दिले. सध्या पावसाळ्याचे वातावरण आहे. त्यामुळे जलशुध्दीकरण केंद्र परिसर स्वच्छता असल्याचे गरजेचे असल्याचे आ.पाटील यांनी सांगितले.
या प्रसंगी स.अभियंता एच.वाय.बोहरे, टी. एस. गाजरे, पी.एम. पाटील, एन.टी. आढे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे श्री.लोखंडे, श्री. निकम, शिवसेना तालुका प्रमुख छोटु भोई, माजी उपजिल्हा प्रमुख गोपाळ सोनवणे, शहर प्रमुख प्रशांत टोंगे, तुषार बोरसे, उज्वलकुमार बोरसे, आ. चंद्रकांतभाऊ पाटील यांचे स्विय सहाय्यक प्रविण चौधरी, संतोष कोळी, वसंत भलभले, प्रफुल्ल पाटील, स्वप्निल श्रीखंडे, शुभम शर्मा, निमखेडी खुर्द येथील संचालाल वाघ, रविन पाटील, महेंद्र गवळी, संदिप गवळी, अनिल काटे आदी उपस्थित होते.