जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारी रोखण्यासाठी जळगाव सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून महिलांसह विद्यार्थींनींना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
जळगाव जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून महिलांचे छेडखानीचे प्रकार वाढले आहे. महिलांनी आपला बचाव कसा करता येईल यासाठी सायबर सुरक्षा व जनजागृती कार्यक्रमाची जिल्हाभरातील सर्व महिला, विद्यार्थीनी, गृहिणी, शिक्षीका तसेच इतर काम करणाऱ्या महिलांसाठी सायबर सुरक्षा व जनजागृती या कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. हा कार्यक्रम समृध्दी महिला मंडळ, जळगाव व मेकरॉकर टेक्नॉलॉजी इन्स्टीटयुशन जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने २८ जुलै रोजी ४.०० वाजता रोटरी हॉल, मायादेवी नगर, जळगाव होणार आहे.
त्याचप्रमाणे जनजागृती व मार्गदर्शनाच्या कार्यक्रमात प्रामुख्याने हॅकींग काय असते व त्याचा आपल्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतो तसेच यापासुन स्वतःची व आपल्या परिवाराची सुरक्षा कशी करावी याचेही मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शहरासह जिल्ह्यातील महिलांनी लाभ घ्याव असे आवाहन जळगाव सायबर विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.