जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मांगल्य वधु वर सुचक केंद्र जळगाव तर्फे आयोजित राज्यव्यापी सर्व शाकीय धनगर समाज वधु वर परिचय मेळावा जळगाव येथे उत्साहात संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नरेंद्र शिरसाठ, चोपडा हे होते त्यांनी सामूहिक विवाह ही काळाची गरज असल्यास आपल्या मनोगत आतून व्यक्त केले.
सदर कार्यक्रमांमध्ये 500 पेक्षा जास्त इच्छुक वधू-वरांनी आपला परिचय करून दिला. २७ वर्षापासून मांगल्य वधु वर सुचक केंद्राचे संचालक रेखाताई न्हाळदे, प्रभाकर न्हाळदे हे सेवा व्रत चालवत आहेत त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून या वधू वर मेळाव्याच्या कार्यक्रमाचे महत्त्व स्पष्ट करून दिले. या कार्यक्रमाप्रसंगी वसुंधरा ताई लांडगे यांच्या साडी चोळी देऊन विशेष सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार राजूमामा भोळे, निवृत्त पोलिस अधिकारी केशव पातोंड, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नजन पाटील, शिक्षण सभापती सुरेश धनके, सुभाष सोनवणे, नाना बोरसे, रघुनाथ सोनवणे, कृष्णा ठाकरे, रमेश सोनवणे, सुभाष करे, रामचंद्र चऱ्हाटे, रामचंद्र निळे, अरुण ठाकरे, संदीप तेले, धनगर महासंघाचे अध्यक्ष दिलीप धनगर, मल्हार सेना जिल्हाध्यक्ष गजानन निळे, कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश बागुल, जिल्हा सरचिटणीस संतोष कचरे, जिल्हा उपाध्यक्ष तुळशीराम सोनवणे, जिल्हा कार्याध्यक्ष यशवंत शिरोळे, हिरामण सावळे, अहिल्या महिला संघ जिल्हाध्यक्ष प्रमिला कंखरे, उपाध्यक्ष शोभाताई मोते, भरत रेवस्कर, उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अक्षय निळे, उमेश सूर्यवंशी, राकेश ठाकरे, राहुल निळे, मयूर ठाकरे, प्रवीण पवार, गणेश निळे, नामदेव सावळे, पांडुरंग पवार, विजय पवार, प्रमोद सोनवणे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा लांडगे व आभार प्रदर्शन गणेश बागुल यांनी केले.