अमळनेर : प्रतिनिधी । पारोळा तालुक्यातील टोळी येथील तरुणीवर अत्याचार करून तिला विष पाजून मारण्याचा आरोप असलेल्या गुन्ह्यातील टोळी येथील शिवानंद उर्फ दादू शालीक पवार याला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे
टोळी येथील पीडित तरुणीचा ७ नोव्हेंबररोजी मृत्यू झाला होता त्यात आरोपी शिवानंद पवार व त्याच्या मित्रांविरुद्ध बलात्कार , खून व ऍट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता डी वाय एस पी राकेश जाधव यांनी शिवानंद यास १९ रोजी अटक केली होती
या आरोपिला अमळनेर येथील जिल्हा न्यायालयात हजर केले असता सरकारी वकील ऍड किशोर बागुल यांनी आरोपीची शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे , गुन्ह्यातील मोबाईल हस्तगत करणे , घटनास्थळ दाखवणे , विषाची बाटली कोणाकडून घेतली , सोबत आणखी कोण तरुण होते का ? आणखी काही आरोपी होते का? याची माहिती तपासात जाणून घेण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली न्या व्ही आर जोशी यांनी आरोपीला 23 नोव्हेंबर पर्यंत चार दिवसांची कोठडी सुनावली.