सात तासाच्या शस्त्रक्रियेनंतर ‘त्या’ पोलीस अधिकाऱ्याचा कापलेला हात जोडण्यात पुन्हा यश

पंजाब (वृत्तसंस्था) पंजाबमधील पोलीस अधिकाऱ्याचा तलवारीने कापलेला हात पुन्हा जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. साधारण सात तास हातावर शस्त्रक्रिया चालली.

 

कर्फ्यू पास मागितल्याने तसंच भाजी मंडईत जाण्यापासून रोखल्याने निहंगा समुदायातील काही जणांनी पोलिसांवर रविवारी हल्ला केला. या हल्ल्ल्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक हरजीत सिंह यांचा हात तलवारीने कापण्यात आला होता. आपला कापलेला हात घेऊन हरजीत सिंह दुचाकीवरुन रुग्णालयात पोहोचले होते. त्यांच्यावर सात तास सर्जरी केल्यानंतर डॉक्टरांना हात जोडण्यात यश मिळाले आहे. पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी ट्विटरच्या माध्यमातून चंदिगडमधील पोस्ट ग्रॅज्यूएट इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल एज्युकेशन ऍण्ड रिसर्च (पीआयएमईआर) रुग्णालयात ही यशस्वी शस्त्रक्रिया झाली.

Protected Content