साकेगाव बायपासजवळ बेकायदेशीर दारू पकडली ; दोघांवर गुन्हा

 

भुसावळ, प्रतिनिधी । साकेगाव बायपासजवळ बेकायदेशीर हातभट्टीची गावठी दारू कॅनमध्ये घेऊन जाणाऱ्या दोघांना मुद्देमालासह पोलिसांनी अटक केली.

संचारबंदीमध्ये तालुका पोलीस स्टेशनचे कर्मचारी पेट्रोलिंग करतांना त्यांना साकेगाव बायपासजवळ दोघे मोटारसायकलने जात असल्याचे आढळून आले. त्यांची विचारपूस केली असता ते दारूची चोरटी वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याजाळ ३५ लिटरच्या कॅनमध्ये २५ लिटर हात भट्टीची तयार दारू मिळून आली. यात दोघे दिनेश नाना नरवाडे व शंकर भगवान महाजन (रा. शहर कोर्टाच्या मागे धम्म नगर, भुसावळ ) यांच्यासह मोटारसायकल व हात भट्टीची दारू असे २८ हजार १५० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात घेऊन त्यांच्यावर संचारबंदी व भादवी कलम २७०, २७१, १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पो . नि. रामकृष्ण कुंभार, सापोनि अमोल पवार, सा. फौ. सुनील चौधरी, भीमदास हिरे, पो. हे. कॉ. विठ्ठल फुसे, विजय पोहेकर, प्रदीप इंगळे, जगदीश भोई , होमगार्ड सेकोकारे यांनी केली आहे.

Protected Content