मुंबई प्रतिनिधी | साकीनाका येथील बलात्कार झालेल्या महिलेचा उपचार सुरू असतांना मृत्यू झाल्याने सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.
साकीनाका येथील महिलेवर अत्याचार केल्यानंते मोहन चौहान या नराधमाने तिच्या गुप्तांगात सळई टाकल्याने या महिलेस रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, तीन दिवस सुरू असलेली तिची मृत्यूची झुंज अखेर अपयशी ठरली. दरम्यान, पोलिसांनी मोहन चौहान या आरोपीला अटक केली आहे. त्याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आता त्याच्यावर हत्येचा गुन्हाही दाखल केला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
आज साकीनाका येथील पिडीतेचा मृत्यू झाल्याने समाजमन सुन्न झाले असून बलात्कार्याला फाशी देण्याची मागणी होत आहे. शक्ती कायदा डिसेंबरमध्ये येत असला तरी आरोपीवर कठोर शिक्षा झाली पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोर्हे यांनी सांगितलं. फास्ट ट्रॅक शब्दही गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे यंत्रणा अधिक वेगवान करायला हवेत, अशी मागणीही त्यांनी केली.