यावल प्रतिनिधी | साकळी-दहिगाव जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शिक्षण, क्रीडा व आरोग्य सभापती रविंद्र सुर्यभान पाटील यांच्या अथक प्रयत्नांनी गटात 2 कोटी 52लाख रुपयांच्या जल जीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली आहे.
यात दहिगाव 50 लक्ष, साकळी 50 लक्ष पिळोदा खुर्द 25 लक्ष, शिरागड 15 लक्ष , शिरसाड 45 लक्ष, थोरगव्हाण 25, लक्ष मनवेल 42 लक्ष असे एकूण 2 कोटी 52 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना प्रथमच साकळी-दहिगाव गटांमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मंजूर झाली आहे.यामुळे या गावातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.सभापती रविंद्र पाटील यांनी गटामध्ये 4 वर्षात अनेक विकास कामे केली असून यात या सर्वात मोठ्या पाणी पुरवठा योजनेची भर पडणार आहे.
यावेळी शिक्षण व आरोग्य सभापती रवींद्र पाटील यांनी सांगितले की गटाचा विकासासाठी मी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. गटाचा विकास व्हावा हेच माझे ध्येय असल्याने सबका साथ सबका विकास हे ब्रीदवाक्य घेऊनच मी गटाचा सर्वांगीण विकास करीत आहे.