साईबाबा जन्मस्थानाचा वाद पेटला ; शिर्डी बंदची हाक

sai baba

 

अहमदनगर प्रतिनिधी । साईबाबा जन्मस्थानाचा वाद उकरून काढणाऱ्या मराठवाड्यातील पाथरी ग्रामस्थांच्या कृतीचा निषेध करण्यासाठी संतप्त शिर्डीकरांनी येत्या रविवारीपासून शिर्डी बंदची हाक दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ‘पाथरी हे शिर्डी साईंचे जन्मस्थळ’ असा उल्लेख केल्याने या वाद पेटला आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे मराठवाड्याच्या दौ-यावर असताना काही लोकांनी साईबाबांच्या जन्मस्थळाच्या विकासासाठी निधी देण्याची मागणी केल्यानंतर साईबाबांचे जन्मस्थळ पाथरीच्या विकासासाठी राज्य सरकारने विकास आराखडा तयार केला असून त्याचे भूमिपूजन लवकरच केले जाईल अशी घोषणा केल्यानंतर देश विदेशातील साईभक्तांमध्ये मोठी खळबळ माजली आहे तसेच शिर्डी ग्रामस्थही आक्रमक झाले आहेत.

साईबाबांनी आपल्या हयातीत आपले नाव, गाव, जात, धर्म उघड केले नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परभणी जिल्ह्यातील पाथरी गावाचा उल्लेख साईबाबांच्या जन्मस्थळाशी करुन शिर्डीकर आणि भाविकांची नाराजी ओढवून घेतली. केवळ सवंग प्रसिद्धीसाठी आणि व्यवसायिक फायद्यासाठी असा वाद काही जण उपस्थित करत आहेत. बाबांच्या नावावर कोणीही धंदा मांडू नये. अन्यथा शिर्डीकर मोठे आंदोलन उभारुन अशा षडयंत्री लोकांवर कारवाई करण्यासाठी भाग पाडतील, असा इशारा साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त सचिन तांबे आणि ग्रामस्थांनी दिला आहे.

Protected Content