सांडपाण्याचा निचरा करा : हनुमान नगरातील नागरिकांचे महापौरांना साकडे (व्हिडिओ)

जळगाव, प्रतिनिधी ।  आयोध्यानगरातील सिद्धिविनायक शाळेच्या पाठीमागील हनुमान नगरात सांडपाणी वाहून जाण्यासाठी पक्क्या गटारी नसल्याने हे सांडपाणी साचून त्यांच्या आरोग्याचा प्रश्न बिकट झाला असून त्वरित पक्क्या गटारी बांधण्यात याव्यात अशी मागणी परिसरातील नागरिकांनी महापौर जयश्री महाजन यांच्याकडे केली आहे. 

 

सांडपाण्याचा निचरा होण्यास जागा नसल्याने हनुमान नगरातील नागरिकांना मागील ९  ते १०  वर्षांपासून दुर्गधी, डास यांच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामुळे लहान मुले व नागरिक आजारी पडत आहेत. याबाबत हनुमान नगरातील नागरिकांनी महापौरांना वारंवार लेखी निवेदन देऊन त्यांची समस्या सोडविण्याबाबत सांगितले आहे. मात्र, त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल न घेतल्या गेल्याने त्यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. आज, त्यांनी पुन्हा महापौर जयश्री महाजन यांना भेटून आपली समस्या मांडली. यात  विशाल गोपाल पाटील, योगेश महाजन, ज्ञानेश्वर बोरसे, स्वप्नील डोळे, रत्नाबाई, सुनिता पाटील, अनिता सोनावणे, सविता वसंत कपले, प्रियंका महाजन, प्रिती पाटील यांचा समावेश होता. याप्रसंगी या नागरिकांना  महापौरांनी लवकरात लवकर त्यांचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले आहे.

 

https://www.facebook.com/508992935887325/videos/2653850634917283

 

Protected Content