सांगायो लाभार्थ्यांच्या नावांच्या याद्या तात्काळ जाहीर करा -डॉ.विवेक सोनवणे

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यात सांगायो मीटिंग होऊन तीन महिने उलटूनही लाभार्थ्यांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या नसल्याने लाभार्थ्यांची फरफट होत असल्यामुळे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ.विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लाभार्थ्यांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.

 

शासनाने संजय गांधी योजना, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेअंतर्गत समाजातील विधवा ,अपंग ,निराधार , वयोवृद्ध यांच्यासाठी त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत चालण्यासाठी दरमहा आर्थिक मानधन देत असून लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर संजय गांधी समितीच्या तपासणीनंतर सदर कागदपत्रांची तहसीलदारांकडून तपासणी होऊन सेवा हमी कायद्या अंतर्गत एक महिन्याच्या आत या मंजूर ,नामंजूर व त्रुटी असलेल्या लाभार्थ्यांच्या नावांच्या याद्या जाहीर करणे बंधनकारक असल्याचे डॉ. विवेक सोनवणे यांनी म्हटले आहे.

परंतु मुक्ताईनगर तालुक्यात सांगायो मीटिंग ही तीन महिने आधी झालेली असून आजतागायत संबंधित लाभार्थ्यांच्या नावांच्या याद्या जाहीर करण्यात आलेल्या नाही त्यामुळे सदर लाभार्थी मोल मजुरी बुडऊन तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारून वैतागलेले असून तालुका प्रशासनासेकडून उडवा उडीचे उत्तरे दिली जात आहे तसेच तालुका प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांच्या संबंधित पंटर पीडित शोषित वंचित लाभार्थ्यांकडून  प्रकरण मंजूर  नावांच्या याद्या जाहीर नसल्यामुळे अशिक्षित लाभार्थ्यांकडून प्रकरण मंजूर करून घेण्यासाठी पैसे उकडत असल्याची चर्चा परिसरामध्ये आहे त्यामुळे जनतेमध्ये तालुका प्रशासनाच्या या सुस्तपणाबद्दल तीव्र नाराजी व असंतोष आहे. जिल्हास्तरावरून स्तरावरून योग्य ती उचित कार्यवाही करून तालुक्यातील  सांगायोच्या लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काचे शासनाकडून मिळणारे मानधन तालुका प्रशासनामुळे प्रलंबित असल्यामुळे सदर मानधन सांगायोच्या लाभार्थ्यांना तात्काळ न मिळाल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तीव्र जन आक्रोश आंदोलन छेडण्यात येईल असे स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ .विवेक सोनवणे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Protected Content