जळगाव, प्रतिनिधी । सांगवी खु। ता. यावल येथे जि. प. प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे भूमीपूजन गुरुवार दि. ६ ऑगस्ट रोजी आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
जि. प. प्राथमिक शाळेच्या संरक्षक भिंतीचे भूमिपूजनसंगी जि. प. सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, लिलाधर चौधरी, शेखर पाटील, सिताराम पाटील, गिरधर पाटील, विकास पाटील, दत्तात्रय पाटील, सदाशिव कोळी इ. मान्यवर तसेच ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.