सांगली वृत्तसंस्था । सांगली जिल्ह्यात परप्रांतियांनी हैदोस घातला आहे. जिल्ह्यातील पाटगाव येथील एका किराणा माल दुकानदारावर परप्रांतिय कामगारांच्या जमावाने हल्ला केला. यावेळी दुकानाची तोडफोड करुन एक स्विफ्ट गाडी पेटवण्यात आली. हल्लेखोरांनी तीन मोटारसायकलीचीही तोडफोड करुन दुकानदाराला मारहाण केली.
कार जळपोळ व दुकानदारास मारहाण केल्याप्रकरणी दोन परप्रांतिय संशयितांना मिरज ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर सात जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व दिलीप बिडकोन कंपनीतील सर्व कामगार असून, रात्री दुकानात येऊन त्यांनी सिगरेटची मागणी केली. दुकानदाराने सिगरेट नाही असे सांगितल्यावर चिडून या परप्रांतिय कामगारांनी दुकानावर हल्ला करुन दुकानाची नासधूस केली. एवढ्यावरच न थांबता परप्रांतियांनी दुकानदारांची स्विफ्ट गाडी पेटवली.
याप्रकरणी अटक केलेले आरोपी कन्हैयाकुमार हा कंपनीत एच.आर. मॅनेजर असून दुसरा रुपेंद्रसिंह तोमर हे दोघे मूळ मध्य प्रदेश येथील असून सध्या ते दिलीप बिडकोन रोड कंस्ट्रक्शन वर्क या कंपनीमध्ये कामास आहेत.