जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील माहेर असलेल्या विवाहितेला चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून सहा लाख रुपये आणण्याची मागणी करत छळ करण्यात आला. या प्रकरणी सोमवारी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबबात अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील नंदगाव येथील माहेर असलेल्या पूनम रवींद्र धनगर (३०) यांचा विवाह चोपडा तालुक्यातील वर्डी येथील रवींद्र रमेश धनगर यांच्याशी झाला. लग्नानंतर १५ दिवसातच विवाहितेच छळ करीत चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरुन सहा लाख रुपये आणावे, अशी मागणी केली जाऊ लागली. यासाठी विवाहितेला शिवीगाळ, मारहाण करण्यात आली. हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी नंदगाव येथे निघून आल्या. त्यानंतर त्यांनी सोमवारी २८ ऑगस्ट रोजी रात्री ९ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती रवींद्र रमेश धनगर, सासू मंगलाबाई रमेश धनगर रा. वर्डी ता.चोपडा यांच्याविरुद्ध तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक संदीप पाटील करीत आहेत.