यावल, प्रतिनिधी । कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्याकरीता राज्य शासनाच्या आदेशानंतर तात्काळ आमचे सलुन व्यवसाय बंद करण्यात आले होते. मात्र, शासनाच्या लॉकडाऊनचा कार्यकाळ पुनश्च वाढवल्याने नाभिक समाज बांधवांवर उपासमारीची वेळ आली असुन उद्या नाभिक समाज बांधवांच्या माध्यमातुन अर्धनग्न आंदोलन करण्यात येणार असल्याच्या माहीतीचे निवेदन यावल तालुका नाभिक समाज अध्यक्ष मनोज ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांनी पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना दिले आहे .
निवेदनात नाभिक समाजाचे यावल तालुका अध्यक्ष मनोज सुर्यवंशी यांनी म्हटले आहे की, कोरोना विषाणुचा प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या आदेशानुसार दिनांक २१ मार्च रोजी पुर्णपणे बंद करण्यात आली होती तेव्हापासुन शासन आदेशानुसार बंदच आहे . नाभिक समाजाचा कुटुंब उदरर्निवाह करण्याचे कटींग सलुन हे एकमात्र व्यवसाय असुन ते बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे . तरी नाभिक समाज बांधवांच्या कौटुंबीक अडचणींना समजुन घेत यावल तालुक्यातील सलुन व्यवसाय पुर्वरत सुरू करण्याची शासनाने परवानगी द्यावी यासंदर्भात यावलचे तहसीलदार जितेन्द्र कुवर यांना दिनांक १८ एप्रिल रोजी आणि पुनश्च ४ जून रोजी याबाबत मागणीचे निवेदन देण्यात आली आहे . मागण्या मान्य न झाल्याने दि. मंगळावर ९ जून रोजी सकाळी १०.३० वाजता यावल तालुका नाभिक समाजच्या माध्यमातुन तहसील कार्यालयासमोर आपले पारंपारीक व्यवसायाची धोपटी घेवुन अर्धनग्न आंदोलन करणार असल्याची परवानगीसाठीची माहीती यावलचे पोलीस निरिक्षक अरुण धनवडे यांना यावल तालुका नाभिक समाज अध्यक्ष मनोज सूर्यवंशी , किशोर श्रीखंडे , बंटी अंबीकार, प्रविण हतकर, सुपडु वारूळकर,अरविंद आसोदेकर आदीच्या यावर स्वाक्षरी आहेत .