एरंडोल प्रतिनिधी। जागतिक योग दिनानिमित्त सर फाउंडेशन या संस्थेतर्फे आयोजित राज्य स्तरीय ऑनलाईन योग शिबिर उत्साहात पार पडले असून यात राज्यभरातून स्त्री-पुरूष सहभागी झाले.
२१ जून जागतिक योग दिनानिमित्त शिक्षण क्षेत्रात राज्य देश आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्य करणार्या सर फाउंडेशनच्या वतीने महाराष्ट्रस्तरीय योग शिबिराचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. योग प्रशिक्षक सुमित शिखरे यांनी झूम मिटींग द्वारा सहभागी सर्व शिक्षकांना ऑनलाइन मार्गदर्शन करून योगाचे धडे दिले. संस्थेच्या फेसबुक पेजवर देखील या मार्गदर्शनाचा विनामूल्य लाभ हजारो शिक्षकांना घेता आला. युजर आयडी आणि पासवर्ड च्या साह्याने या राज्यस्तरीय योग शिबिरासाठी देशभरातील अनेक शिक्षक सहभागी झाले असल्याचे या शिबिरात सहभागी तथा सर फाउंडेशन जळगाव जिल्ह्याचे जिल्हासमन्वयक आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग संघटना राज्य समन्वय समितीचे राज्य समन्वयक तथा महाराष्ट्र राज्य समता शिक्षक संघाचे राज्य महासचिव किशोर पाटील कुंझरकर यांनी सांगितले.
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात सर फाउंडेशनचे सिद्धार्थ माशाळे, बाळासाहेब वाघ,हेमाताई शिंदे,अनघा जहागीरदार, राजकिरण चव्हाण,मधुकर घायदार ,शाहू भारती,अर्जुन साळवे,अरुण जाधव सर्व जिल्हा समन्वयक अशा सर्वांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात पोहोचले आहे. तर, ऑनलाईन योगाचे धडे गिरविण्यासाठीसिद्धार्थ माशाळे बाळासाहेब वाघ हेमाताई शिंदे किशोर पाटील कुंझरकर, भूपेंद्र पाटील, द्वारका पिंपळे, गौरी ढमाळे,सचिन जाधव, सखाराम पातोडी, रेणुका शिरेगोंड, सारिका जैन, सीमा तायडे, दीपिका जाधव क्षिरसागर, वंदना कुलकर्णी ,अश्विनी झाडे, माया पगारे, सचिन जाधव, हमीद खान पठाण, आदींनी हजारो शिक्षकांसह सहभाग घेऊन योगाचे कृतीयुक्त धडे गिरविले.
दरम्यान अभिनव पद्धतीने ऑनलाईन माध्यमातून सुप्रसिद्ध योग प्रशिक्षक सुमित शिखरे यांनी सर्वांना सर्व योगाच्या पद्धती कृतीयुक्त पद्धतीने शिकवून सहभागी सर्वांना ऑनलाईन प्रात्यक्षिक करवून घेतले. या सर फाउंडेशन च्या अभिनव पद्धतीने जागतिक योग दिनाच्या उपक्रमाच सर्वत्र कौतुक होत आहे.