सराव सामन्यात आघाडीची सरशी : गुलाबराव पाटलांची फटकेबाजी ! ( व्हिडीओ )

जळगाव प्रतिनिधी ।  महाविकास आघाडीच्या तीन चाकांच्या गाडीला आता जनतेच्या चौथ्या चाकाची जोड मिळाल्याने ही चार चाकांची गाडी सुसाट धावतेय. पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील सराव सामन्यात आघाडीला विजय मिळाला असून आता आघाडी २५ वर्षे सत्तेवर राहणार असल्याचा आत्मविश्‍वास आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केला.

पदवीधर मतदार संघाची निवडणूक ही महाविकास आघाडीची ट्रायल मॅच झाली असे सांगत ते पुढे म्हणाले की , महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पहिल्यांदा राज्य पातळीवर निवडणूक एकत्र लढलो आणि यात भाजपच्या ताब्यातील जागांवर देखील घवघवित यश मिळवले या निवडणुकीचा निकाल म्हणजे हे सरकार चांगलं काम करत असल्याचा जनतेचा विश्वास दिसतो आहे या विश्वासामुळे हे तीन चाकी नाहीतर चार चाकी सरकार आहे

जो शेतकऱ्यांशी भिडतो त्याला त्याचे परिणाम भोगावे लागतात, हे शेतकरी जंतर मंतर मैदानावर मंतर मारल्याशिवाय राहणार नाही.असे त्यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनाबद्दल सांगितले
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/169595408210487

Protected Content